कोरोना प्रतिबंधात्मकते साठी ग्रामपंचायत कासेगाव नी केलेल्या उपाययोजना क्षणचित्रे व वर्तमानपत्र बातम्या


1.औषध फवारणी
2.लोकांचा आरोग्याची काळजी व सर्व्ह
3.लोकांच्यात जनजागृती
4.शेतीमालाचे व किराणा विक्री साठी व्यवस्थापन
5.आठवडा बाजार बंदी
6.शासकीय सूचनांचे काटेकोर पालन
7. रेशन व इतर शासकीय उपक्रमांनाची योग्य अंमलबजावणी.

कासेगांव येथे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर कासेगांव येथे कडक लाॅकडाॅन संदर्भात सुचना देताना तहसीलदार मा.रविंद्र सबणीस, प्रांताधिकारी मा.नागेश पाटील, कासेगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.सोमनाथ वाघ, युवानेते मा.देवराज पाटील (दादा), कासेगांवचे लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), ग्रामसेवक मा.राहुल सातपुते व सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

*महाविकासआघाडी सरकारने कोरोनाच्या संकटकाळात गरजवंतांना स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कासेगांव येथे 'ब' गटाच्या शिधापत्रिका धारकांना युवानेते मा.देवराज पाटील (दादा) यांच्या प्रमुख उपस्थित धान्य वाटप करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा) उपसरपंच मा.दाजी गावडे, पोलिस पाटील मा.माणिक बडेकर, ग्रामपंचायत सदस्य मा.फिरोज आत्तार व इतर मान्यवर उपस्थित होते.*