कासेगाव ग्रामपंचायत येथे आज गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.* *यावेळी लोकनियुक्त सरपंच मा. किरण पाटील (दादा), समाभूषण मा. सचिन पाटील (काका), उपसरपंच मा. दाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य मा. संतोष पाटील, मा. संभाजी पाटील (राजे) ग्रामसेवक मा.राहूल सातपुते, व इतर मान्यवर उपस्थित होते.

सावंतमळा कासेगाव येथे कोरोना चा प्रादुर्भाव वाढला असून आज सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. देवराज पाटील (दादा) यांनी भेट देऊन प्रशासनास व सावंतमळा येथील लोकांना योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा. किरण पाटील (दादा), डॉ. भिसे, ग्रामपंचायत सदस्य मा. फिरोज अत्तार, ग्रामसेवक मा.राहुल सातपुते व इतर मान्यवर उपस्थित होते.

कासेगांव येथे मातंग समाजातील अतंर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार मा.मानसिंग नाईक (भाऊ) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जेष्ठ नेते मा.जनार्दन पाटील (काका), सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा), सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ.संगीता पाटील (ताई), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), उपसरपंच मा.दाजी गावडे, पोलिस पाटील मा.माणिक बडेकर, मा.रामभाऊ वायदंडे, मा.अनिल साठे, ग्रामसेवक मा. राहुल सातपुते सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.